Viral Video : धूम स्टाईलने चोरी; बाईकवरून आले अन् महिलेच्या गळ्यातील चैन खेचून पळाले, घटना CCTVत कैद

Chain Snatched From Womans Neck Video : एका चोराने मॉर्निंग वॉकला निघालेल्या महिलेच्या गळ्यातील चैन चोरल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. ही घटना उत्तर प्रदेशमधील असल्याचं सांगितलं जातंय.
धूम स्टाईलने चोरी
Viral VideoSaam Tv
Published On

मुंबई : रस्त्यावर मॉर्निंग वॉकला निघालेल्या एका महिलेची सोनसाखळी चोरीला गेलीय. ही घटना उत्तर प्रदेशमधील आहे. महिला मॉर्निंग वॉकसाठी रस्त्यावरून जात होती. त्यावेळी दुचाकीवरून दोन तरूण आले. थोडं अंतर मागेच थांबून एकजण गाडीवरून खाली उतरला. हळुहळू महिलेच्या मागे आला अन् तिच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून त्याने पळ काढला.

धूम स्टाईलने चोरी

जानकीपुरममधील सहारा राज्य मार्गाजवळ ही घटना घडली आहे. रस्त्यावर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये ही चोरीची घटना कैद झालीय. हल्लेखोरांपैकी एकाने चोराने पायी जात असताना (Chain Snatched From Womans Neck) अचानक महिलेच्या गळ्यातील चैन हिसकावून घेतली. जवळच थांबलेल्या त्याच्या साथीदारासह दुचाकीवर बसत निघून गेला. व्हिडिओमध्ये दिसतंय की, महिला चोराचा पाठलाग देखील करत आहे.

घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

उत्तर प्रदेशमध्ये चोर आणि गुन्हेगारांचं मनोबल उंचावल्याचं (Uttar Pradesh) दिसतंय. दिवसाढवळ्या अगदी गजबजलेल्या परिसरामध्ये चोरीच्या घटना घडत आहेत. लखनऊच्या जानकीपुरममध्ये दोन चोरट्यांनी मॉर्निंग वॉकला निघालेल्या महिलेच्या गळ्यातील साखळी चोरली. या संपूर्ण चोरीच्या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. मदतीसाठी या महिलेनं आरडाओरड करत हल्लेखोरांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरलाय.

धूम स्टाईलने चोरी
Viral Video: मेट्रोमध्ये पुन्हा राडा! काकांनी सुपरमॅन स्टाईलने हाणला बुक्का, सह प्रवाशाला धु धु धुतलं, VIDEO तुफान व्हायरल

हल्लेखोरांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न

यावेळी महिलेने चोराचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र दोन्ही चोरटे पळून गेले (Viral Video) होते. या घटनेमुळे चोरटे पोलिसांचे धाबे दणाणल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. X सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर @Lucknowalaa या हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात (Viral News) आलाय. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेने रहिवाशांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता निर्माण केलीय.

धूम स्टाईलने चोरी
Viral Video: पांढरी टोपी अन् पांढरा पोशाख, संबळच्या तालावर ठेका धरत थिरकले काका; VIDEO तुफान व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com