Cat Viral Video: गोरे-गोरे गाल आणि झुपकेदार शेपूट; मांजर बनली चक्क नवरी, पाठवणीचा VIDEO व्हायरल

Bridal Cat Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका मांजरीचा भन्नाट व्हिडिओ व्हायरल झालाय.
Cat Viral Video
Cat Viral VideoSaam TV

Viral Video: सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. मांजर म्हणजे सगळ्यांची आवडती मनीमाऊ. अनेक व्यक्ती आपल्या घरात मांजर पाळतात. पांढऱ्या शुभ्र मनीमाऊ कमालीच्या गोंडस दिसतात. सोशल मीडियावर सध्या एका मांजरीचा भन्नाट व्हिडिओ व्हायरल झालाय. (Latest Marathi News)

मांजर झाली नवरी

मांजरींचे बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. यातील काही व्हिडिओमध्ये मांजरीला सुंदर पोषाख घातलेला दिसतो. कधी फ्रॉक तर कधी टोपी असं काही ना काही या मांजरीला घातलं जातं. अशात आता समोर अलेल्या व्हिडिओमध्ये एक मांजर थेट नवरी सारखी नटली आहे.

Cat Viral Video
Heart Attack Viral Video : बाइक चालवत असतानाच आला हृदयविकाराचा तीव्र झटका, काही सेकंदात होत्याचं नव्हतं झालं

मांजरीचा साजश्रृंगार

व्हिडिओमध्ये (Video) दिसत आहे की, गुबगुबीत मांजरीला सुंदर नवरी बनवलं आहे. डोक्यावर हिरवी आणि मोत्याची लेस असलेली ओढणी ठेवली आहे. त्याच ओढणीला लाल लेस लावत ती संपूर्ण अंगावर दिली आहे. तसेच नेकलेसचं वजन मांजरीला पेलवणार नाही त्यामुळे जाड लेस मांजरीच्या गळ्यावर लावत तिलाच नेकलेस बनवलं आहे.

मांजरीटची पाठवणी

मांजरीला नवरीसारखं (Bride) नटवत या व्यक्तीने तिची पाठवणी करण्याचा माहोल तयार केला आहे. बॉलिवूडचं सजन घर मै चली, असं गाणं यावेळी लावण्यात आलंय. 2@lucckysahal या इंस्टा अकाउंटवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करत त्यावर कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "बाबांच्या घरुन बिदाई, पहाटे ४ वाजता."

Cat Viral Video
Mumbai Local Train Viral Video: महिला मंडळाचा नादच खुळा; लोकल ट्रेनच्या डब्ब्यांना दिली भन्नाट नावे, वाचून म्हणाल...

मांजरीच्या डोळ्यात आलं पाणी

मांजरीची (Cat) पाठवणी सुरु असताना सर्व माहोल पाहून तिच्याही डोळ्यांत पाणी आलेलं दिसतंय. मांजरीचा हा व्हिडिओपाहून नेटकऱ्यांनी यावर विविध कमेंट केल्यात. काही व्यक्ती देखील भाऊक होत रडण्याचे इमोजी पाठवत आहेत. तर मांजरीला पाहून अनेक जण थक्क झालेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com