Ekole Valley: ट्रेकींगला गेलेल्या तरुणांच्या वाहनांनी घेतला पेट, प्रसिद्ध एकोले वॅली येथील थरारक VIDEO व्हायरल

Ekole Valley Viral Video: ट्रेकींगसाठी उंचावर जाताना आपण स्वत:च आपली काळजी घेणे गरजेचं असतं. थोडासा निष्काळजीपणा केला तरी मोठा अपघात घडण्याची शक्यता असते.
Ekole Valley
Ekole ValleySaam TV

Tourists Viral Video:

सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये भ्रमंती, ट्रेकींग करणे सर्वांनाच आवडतं. अनेक पर्यटक ट्रेकींगसाठी विविध ठिकाणी भेट देतात. गड, किल्ल्यांसह सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्येही फिरणं अनेक तरुण पसंत करतात. मात्र ट्रेकींगसाठी उंचावर जाताना आपण स्वत:च आपली काळजी घेणे गरजेचं असतं. थोडासा निष्काळजीपणा केला तरी मोठा अपघात घडण्याची शक्यता असते. अशात ट्रेकींगसाठी प्रसिद्ध असलेल्या एकोले वॅली येथे काल अशीच एक घटना घडली.

Ekole Valley
Tourist Places: सुट्टीत मस्त फिरायचंय? अहमदनगरमधील 'या' ठिकाणांना आवर्जून भेट द्या

काही तरुण येथे ट्रेकींगसाठी आले होते. यावेळी तरुणांनी सपाट जागा असलेल्या ठिकाणी आपली वाहने दुचाकी उभ्या केल्या. त्यानंतर ते ट्रेकींगला गेले. ते पुन्हा परतले तेव्हा समोरील दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्यांची संपूर्ण वाहने जळून खाक झाली होती. ते पोहचले त्यावेळी देखील आग पूर्णत: शांत झालेली नव्हती. वाहने जळाल्याने त्यातून वासही येत होता.

तरुणांनी ज्या ठिकाणी आपली वाहने पार्क केली होती तेथे खाली सर्व सुकलेलं गवत होतं. या गवताला अचानक आग लागली. गवत सुकलेलं असल्याने आगीने क्षणात पेट घेतला. त्यामुळे सर्व वाहनेही जळून खाक झाली. ११ फेब्रुवारी रोजी एकोले वॅली, लोटस पॉइंट, याठिकाणी ही घटना घडली आहे.

@atrangitrekkers या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिल्यात. एकाने कमेंटमध्ये लिहिलं आहे की, जे झालंय ते खुप वाईट झालं आहे. मित्रांनो खचून जाऊ नका नशिबाची साथ असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पुन्हा कष्ट करुन गाडी घेऊ शकतो. परमेश्वराने हे सुंदर डोळे ही सुंदर सृष्टी पाहण्यासाठी गेलेल्या मित्रांना मात्र हा वाईट प्रसंग पहावा वाटला याचं दुःख खरं तर मला पण होतंय, असं ट्रेकींग करणाऱ्या एका तरुणाने कमेंटमध्ये म्हटलंय.

तसेच गावातले लोकं प्रत्येत पॉइंटला पैसे घेऊन पार्कींग करतात आणि पैसे घेऊन आग लागते तेव्हा ते लोक कुठे जातात? असा सवाल एका नेटकऱ्याने विचारला आहे. ट्रेकींग करणे ही साधी सोप्पी गोष्ट नाही. भल्याभल्यांना ट्रेकींग करता करता घाम फुटतो. अशा ठिकाणी वैद्यकीय सुविधा देखील तात्काळ उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे ट्रेकींगला जाताना प्रत्येकाने सर्व पद्धतीने स्वत:ची काळजी घ्यायला हवी.

Ekole Valley
Thane Crime News: भिवंडीत नकली बंदुकीने दहशत माजवण्याचा प्रयत्न; Video आला समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com