Boss Gifts Car: बॉस नाही भगवान! कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्टमध्ये दिल्या महागड्या कार; VIDEO व्हायरल

Boss Gifts Car To Employees Viral Video: सध्या सोशल मीडियावर उद्योजक एमके भाटिया यांची चांगलीच चर्चा आहे. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट म्हणून कार दिल्या आहेत.
Car
CarSaam Tv
Published On

दिवाळीनिमित्त प्रत्येक ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांना काही न काही गिफ्ट्स दिले जातात. सध्या ऑफिसमधील गिफ्ट्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दरम्यान, फार्मा उद्योगातील उद्योजक एमके भाटिया यांनी कर्मचाऱ्यांना थेट कार गिफ्ट म्हणून दिल्या आहेत. त्यांनी सलग तीन वर्षे कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त कार भेट दिल्या आहेत. याचाही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Car
कंबरेला स्पर्श, किस करण्याचा प्रयत्न; दिवाळीच्या जत्रेत मुलीशी छेडछाड, घटनेचा Video Viral

दिवाळीत कार गिफ्ट मिळाल्याने कंपनीच्या कर्मचाऱ्यांना खूप जास्त आनंद झाला आहे. या कंपनीच्या बॉसची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा आहेत. त्यांनी कर्मचाऱ्यांना किआ आणि निसान अशा महागड्या कार गिफ्ट म्हणून दिल्या आहेत. भाटिया यांनी आतापर्यंत कर्मचाऱ्यांना ५१ कार गिफ्ट म्हणून दिल्या आहेत.

भाटिया हे गेल्या तीन वर्षांपासून कर्मचाऱ्यांना दिवाळीला गिफ्ट म्हणून कार देतात. याबाबत त्यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांचा आनंद आणि सामायिक यश याला ते प्राधान्य देतात. हा उपक्रम कंपनीच्या समर्पित टीम आणि त्यांच्या मेहनतीचा सन्मान करण्यासाठी आहे. ते कर्मचाऱ्यांना सेविब्रिटी मानतात.

Car
Diwali Abhyang Snan Positivity: अभ्यंगस्नान करताना अंघोळीच्या पाण्यात टाका या वस्तू, शरीरात दिसतील चांगले बदल

भाटिया यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. भाटिया हे एमआयटीएस समूहाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या मेडिकल स्टोअरला २००२ मध्ये खूप मोठा तोटा सहन करावा लागला होता. त्यानंतर त्यांनी खूप मेहनत घेतली. आता त्यांच्या अध्यक्षेखाली १२ कंपन्या आहेत.ते आता इतर देशांमध्येही आपल्या व्यवसायाचा विस्तार करणार आहेत.

भाटिया यांच्या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे. बॉस असावा तर असा अशाही प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त करण्यात आल्या आहेत.

Car
Diwali 2025: 800 वर्षांनंतर दिवाळीला बनणार 5 राजयोग; 'या' 3 राशी रातोरात होणार श्रीमंत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com