ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दिवाळीत अभ्यंगस्नानाला विशेष महत्व आहे. नरकचतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान केले जाते.
सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे आरोग्याला देखील फायदा होतो.
तुम्ही देखील अभ्यंगस्नान करण्यापूर्वी पाण्यात काही वस्तू मिक्स केल्यास तुमच्या आरोग्याच्या समस्या दूर होतील.
कडूलिंब आरोग्यासाठी गुणकारी मानले जाते. कडूलिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात टाका.
तुरटी अंघोळीच्या पाण्यात मिक्स केल्याने अँटीबॅक्टेरियल गुणधर्म निघून जातात.
अंघोळीच्या पाण्यात मीठ टाकल्याने शरीराला दुर्गंधी येत नाही. ताजेतवाने वाटते.
लिंबू हे आबंट फळ आहे यामुळे त्वचा, केस हे देखील सुधारण्यास मदत होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.