मुंबई : कोलकाता येथे एका डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याची घटना अजून ताजीच आहे. त्या प्रकरणातील गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आता नागरिकांकडून होतेय. मात्र, असं असताना देखील गुन्हेगारांचे मनोधैर्य कमी होताना दिसत नाही. नुकतंच उत्तर प्रदेशातील आग्रा शहरामधून आणखी एक लाजिरवाणी घटना उघडकीस आलीय. तिथे काही बदमाशांनी रस्त्यावर एका तरूणी खुलेआम विनयभंग केलाय.
स्कूटरवरून जाणाऱ्या तरुणीचा दोन दुचाकीस्वार तरुणांनी अनेक किलोमीटरपर्यंत पाठलाग करताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. या हुल्लडबाज तरुणांनी स्कुटीवरून जाणाऱ्या तरुणीचा सतत विनयभंग करत अश्लील शेरेबाजी (Biker gang chases harasses woman) केलीय. या वेळी एका ट्रॅफिक कॉन्स्टेबलने तरूणीची मदत केली, त्यामुळे तिला वेळीच वाचवता आलं. समाजात महिलांची सुरक्षा हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनलाय.
घटनेदरम्यान तरुणी आणि तिच्या साथीदारांनी विरोध केला असता, हुल्लडबाज तरूणांनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. वाहतूक पोलिसांच्या तत्परतेने मुलीला सुरक्षित स्थळी नेण्यात आलं. पोलिसांनी घटनास्थळ गाठून या प्रकरणाचा तपास सुरू (agra news) केलाय. याप्रकरणी कारवाई करत आग्राच्या छट्टा पोलिसांनी गुड्डी मन्सूर खान या आरोपी युसूफ आणि अन्य एका साथीदाराला अटक केलीय. मात्र, अन्य तीन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. सर्व आरोपींना लवकरात लवकर पकडले जाईल आणि कायद्यानुसार शिक्षा होईल, असे पोलिसांचं म्हणणं आहे.
ही मुलगी स्कूटरवरून आपल्या घरी जात होती, तेव्हा काही टवाळखोर तरूणांनी तिची छेड काढली. त्यामुळे या घटनेने आग्रा येथील बदमाशांच्या वाढत्या धाडसावर आणि पोलिसांच्या तत्परतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले (viral video) आहे. १८ ऑगस्ट रोजी रविवारी रात्री आग्र्यामध्ये मुसळधार पाऊस पडत होता. तेव्हा एक तरुणी स्कूटरवरून बेलागंज येथील आपल्या घराकडे जात होती.
वाहतूक पोलीस राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दुचाकीस्वार तरुणांनी तरुणीचा पाठलाग सुरू केला. एका दुचाकीवर दोन तरुण तर दुसऱ्या दुचाकीवर तीन तरुण होते. त्यांनी तरूणीच्या स्कूटरला घेराव घालून तिचा विनयभंग केला. वाहतूक पोलिस राजीव कुमार यांनी घटनास्थळी पोहोचून दुचाकीस्वारांना थांबवल्यानंतर त्यांनी पोलिसांशीही गैरवर्तन केलं (viral news) होतं. या घटनेनंतर अँटी रोमियो पथकाने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.