Snake Dance Viral Video
Snake Dance Viral VideoSaam Tv

Snake Dance: काकूंचा नागिन डान्स पासून काकांनी घेतला सापाचा अवतार! पुंगी घेऊन आजोबाही थिरकले, Video बघावाच लागेल

Snake Dance Viral Video: पार्टी म्हटली नाचगाणं आलंच. नाच म्हटला की त्याला वयाचं काही बंधन नसतंच. ज्यांचं मन तरुण असतं, अशा वयस्कर लोकांनाही कधीकधी नाचण्याचा मोह आवरता येत नाही.

Snake Dance Viral Video:

पार्टी म्हटली नाचगाणं आलंच. नाच म्हटला की त्याला वयाचं काही बंधन नसतंच. ज्यांचं मन तरुण असतं, अशा वयस्कर लोकांनाही कधीकधी नाचण्याचा मोह आवरता येत नाही. मनाने तरुण असणाऱ्या अशा वयस्कर काकांचा व्हिडीओ सोशल मीडियात धुमाकूळ घालतोय.

एका पार्टीत नागिन गाण्यावर नाचणाऱ्या एका महिलेचे ठुमके पाहून दोन काकांना स्वतःला रोखता आलं नाही. ते दोघंही पुढे आले आणि त्यांनी या पार्टीत चक्क सापाचा अवतार घेऊन ज्या स्टेप्स मारल्या, त्या आता कमालीच्या व्हायरल झाल्यात. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Snake Dance Viral Video
Delhi Metro Video : दिल्ली मेट्रोत लेडीज कोचमध्ये मद्यापी तरुणाची एन्ट्री; महिलांनी केलं असं काही, VIDEO जोरदार व्हायरल

व्हायरल व्हिडीओमध्ये एका काकांनी नागाची पुंगी वाजवण्याचा अभिनय करत डान्स करण्याचा प्रयत्न केल्याचं तुम्ही पाहू शकताय. मै नागिन तू सपेरा गाण्यावर थिरकताना सुरुवातील काकूंची दिसत होत्या. पण नंतर आलेल्या दुसऱ्या काकांनी तर चक्क सापासारखं अंग वळवण्याचा प्रयत्न केला आणि जमिनीवरच सापासारखे लोळलेही. या तिघांनी मिळून केलेला हा डान्स पाहून उपस्थितांना हसूही रोखता आलं नाही. सगळ्यांनीच मिळून या हटके डान्सचा आनंद घेतला.  (Latest Marathi News)

या पार्टीत असलेल्या एका व्यक्तीनेच हा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आणि नंतर सोशल मीडियात अपलोड केलाय. @Hi_itsok या एक्स अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.

Snake Dance Viral Video
Girls Fight Viral Video: पोरींचा राडा... भररस्त्यात तुफान हाणामारी; घटनेचा व्हिडिओ व्हायरल

एक हसीना दो दीवाने, बहुत प्यारे और मस्ताने असं कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. आतापर्यंत एक हजार चारशेपेक्षा जास्त लोकांना हा व्हिडीओ भावलाय. तर शंभरपेक्षा जास्त युजर्सनी या व्हिडीओवर रिप्लाय केलाय. आतापर्यंत १ लाख ७६ हजारपेक्षा जास्त व्हूज मिळालेला हा व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच गाजतोय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com