CCTV Footage : बापरे! भरधाव कार थेट कचोरीच्या दुकानात शिरली; ४ जखमी, घटनेचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

Delhi News : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ मार्च रोजी ही थरारक घटना घडली आहे. यामध्ये ४ जण थेट कारखाली चिरडले गेलेत. वाहनचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यने हा अपघात झाल्याचं दिसत आहे.
CCTV Footage
CCTV FootageSaam TV

Accident Video:

दिल्लीच्या सिव्हिल लाईन्स पोलीस स्टेशन हद्दीत अपघाताची एक थरारक घटना समोर आली आहे. एक कार अनियंत्रीत होऊन थेट कचोरीच्या दुकानात शिरली आहे. या दुकानात काही व्यक्ती कचोरी खात होते. तर काही जण दुकानाबाहेर उभे होते. अचानक समोरून एक कार भरधाव वेगात कारसमोर आली आणि दुकानात शिरली.

CCTV Footage
Delhi Liquor Case: 'आप'चा आणखी एक मंत्री अडचणीत; मद्य धोरण घोटाळा प्रकरणात ईडीने पाठवलं समन्स

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ मार्च रोजी ही थरारक घटना घडली आहे. यामध्ये एक ४ जण थेट कारखाली चिरडले गेलेत. वाहनचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यने हा अपघात झाल्याचं दिसत आहे. अपघातग्रस्त कारमध्ये एक जोडपं बसलं होतं. कारमधून प्रवास करणारा व्यक्ती पेशाने वकिल असल्याचं समजलं आहे. त्यांच्या पत्नी देखील कारमधून खाली पडल्या होत्या.

सदर घटनेचा थरार येथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कार सरळ दुकानात शिरली. त्याखाली काही व्यक्ती दाबल्या गेल्या. कचोरीच्या दुकानातील भींतीमुळे कार तिथेच थांबवता आली. त्यानंतर कार चालकाने आपली कार काहीशी मागे घेतली. कार मागे घेतल्यावर आपली पत्नी कारमध्ये नसल्याचं या व्यक्तीने पाहिलं.

त्यामुळे पत्नीला शोधण्यासाठी सदर व्यक्ती कारमधून खाली उतरला. कारच्या आजुबाजूच्या जागेत आपल्या पत्नीला शोधू लागला. त्यावेळी पत्नी कारसमोर भींतीजवळ उभी होती. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थाळी धाव घेतली. त्यांनी कारसह वाहनचालकाला ताब्यात घेतले. त्यावेळी कार चालक नशेत होता असं तपासात समजलं आहे.

दारूच्या नशेत कार चावल्याने अपघात झाल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. सदर घटना समोर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

CCTV Footage
Viral Video : धावत्या ट्रेनमध्ये वॉशरूमला जाण्यासाठी तो स्पायडरमॅन झाला; व्हिडिओ तुफान व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com