VIDEO : धावत्या ट्रेनसमोर महिलेने अचानक घेतली उडी, चालकाने ब्रेक लावला अन्....

Viral Video: दररोज सोशल मीडियावर धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. अलीकडेच एका महिलेचा फास्ट ट्रेनसमोर उडी मारतानाचा व्हिडीओ समोर आला असून तो प्रचंड चर्चेत आहे.
Viral Video
Viral VideoSaam tv
Published On

सोशल मीडियावर दररोज नवनवीन आणि धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असतात. स्टंट, अपघात, वाद, मारामारी यासारख्या घटनांचे व्हिडीओ सतत समोर येत असतात. अनेकदा सतर्कतेचे आवाहन करूनही लोक अशा कृती पुन्हा पुन्हा करतात. उंच इमारतींवरून उड्या, सार्वजनिक ठिकाणी नृत्य, वाद घालणे, हे प्रकार थांबत नाहीत.

अशातच आता एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसतंय की एका महिलेने अचानक येणाऱ्या फास्ट ट्रेनसमोर उडी घेतली. या घटनेचा थरारक क्षण एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केला आणि तो सोशल मीडियावर शेअर करताच व्हिडीओ व्हायरल झाला. या घटनेने पुन्हा एकदा स्टंट्सच्या गंभीर परिणामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Viral Video
Shocking Video: प्रसाद खरेदीला नकार, भाविकाला मारहाण; व्हिडिओ पाहून नागरिकांमध्ये संताप

व्हिडीओमध्ये स्पष्टपण दिसत आहे की, एका महिलेने अचानक हाय-स्पीड ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. चालकाने ताबडतोब ब्रेक मारले. ज्यामुळे महिलेचा जीव वाचला. मात्र, तिच्या हाताला दुखापत झालेली या व्हिडीओमध्ये दिसत आहे. लोकांच्या मदतीने तिला रुग्णालयात पाठवण्यात आले.

Viral Video
Pepsi Viral Video: तुम्हाला माहित आहे का लहानपासून खाल्लेली पॅप्सी कशी बनते? पाहा व्हायरल VIDEO

हा व्हिडीओ 'FirstBiharJharkhand' या ट्विटर अकांऊट या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ६०० पेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत आणि १ लाख २२ हजारापेक्षा जास्त लोकांनी तो पाहिला आहे. हा सर्व प्रकार एका व्यक्तीने कॅमेऱ्यात कैद केले आहे.

Viral Video
Salman Khan: बजरंगी भाईजानच्या हातात रामाचं घड्याळ, सलामान खानच्या खास घड्याळची किंमत ऐकून व्हाल थक्क

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com