200 Year Old Grandmother : बापरे, 200 वर्षांची आजीबाई अजूनही जिंवत? 1८ व्या शतकात जन्म झाल्याचा दावा, व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Special Report : आजीबाईंचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक आजीबाई तब्बल 200 वर्ष जिवंत असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र हा दावा खोटा ठऱला आहे.
200 Year Old Man
200 Year Old ManSaam Digital
Published On

आता बातमी आहे सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या आजीबाईंच्या एका व्हिडिओची... या व्हिडिओत एक आजीबाई तब्बल 200 वर्ष जिवंत असल्याचा दावा करण्यात आलाय. त्यांनी 65 वर्ष केवळ दूध आणि फळं खाल्ली असाही मेसेज व्हायरल करण्यात येतोय. आम्ही या व्हिडीओची पडताळणी केली. तेव्हा काय सत्य समोर आलं पाहा.

सोशल मीडियात व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहा...व्हिडीओत दिसणाऱ्या या आजीबाई तब्बल 200 वर्षांच्या असल्याचा दावा करण्यात आलाय. 17व्या शतकात जन्मलेल्या आजीबाई अजूनही ठणठणीत असल्याचं सांगून हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल केला जातोय. या व्हिडीओत नेमका काय दावा करण्यात आलाय.

या आजीचं नाव लाया असं असून त्या नेपाळच्या रहिवासी आहेत. 17व्या शतकात जन्मलेल्या आजीबाईंचं वय तब्बल 200 वर्ष आहे. 65 वर्ष त्यांनी पोळी-भाजी खाल्लेलीच नाही. केवळ दूध, फळं आणि प्रोटीनयुक्त पदार्थ खाऊन त्या जिवंत राहिल्या आहेत. आजींना डोळ्यांनी दिसत नसल्यानं केवळ हाताच्या स्पर्शानं त्या आपल्या आजुबाजुच्या लोकांना ओळखतात.

200 Year Old Man
US Presidential Election : कशी होते अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक? भारत आणि अमेरिकेच्या लोकशाहीत काय आहे फरक? वाचा सविस्तर

व्हायरल व्हिडीओवर कमेंटचा पाऊस पडतोय. अनेकांनी या व्हिडीओवरून आश्चर्य व्यक्त केलंय. खरंच एखादी व्यक्ती 200 वर्ष जगू शकते का? माणसाचं सरासरी आयुष्य किती वर्ष असू शकतं. असे सवाल उपस्थित होतायेत. साम टीव्हीनं या व्हिडीओची पडताळणी केली. व्हिडीओ नीट तपासून पाहिला तेव्हा काय सत्य समोर आलं पाहा.

व्हायरल व्हिडीओतील व्यक्ती जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती नाही. जगातील सर्वात वयस्कर व्यक्ती म्हणून जपानमधील केन तनाका यांच्या नावाची गिनीज बुकात नोंद आहे. केन तनाका या 19 एप्रिल 2022 रोजी वयाच्या 119 व्या वर्षी मरण पावल्या. व्हायरल व्हिडीओतील व्यक्तीचं नाव लियांग फो याई असं असून ते थायलंडमध्ये बौद्ध भिख्खू होते. वयाच्या 109व्या वर्षी त्यांचं निधन झालंय. याचाच अर्थ व्हायरल व्हिडीओतील व्यक्ती जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती नाही. व्हिडीओत करण्यात आलेला 200 वर्षांचा दावा असत्य ठरलाय. या व्हिडीओवर विश्वास ठेऊ नका.

200 Year Old Man
IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर गेली कुठे! पोलिसांच्या तपासात वेगळीच माहिती आली समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com