Viral News : रील तयार करण्यासाठी हल्ली तरुण पिढी कुठल्या टोकाला जाईल ते सांगता येत नाही. रील बनवण्याच्या नादात आपला जीव धोक्यात घालतात. गेल्या काही दिवसांत आशाप्रकारच्या अनेक घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. त्यामध्ये आता आणखी भर पडली आहे. राजस्थानमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये दोन तरुण रील करण्याच्या नादात धबधब्यात वाहून गेले. ते १५० खोल दरीत कोसळले, या दुर्दैवी घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
राजस्थानच्या भिलवारामधील मैनाल धबधब्यावर ही दुर्दैवी घटना घडली. रील काढण्याच्या नादात एक तरुण पडला. या दुर्दैवी घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओत दिसत आहे की, तरुण मुलं धबधब्याजवळ जीव धोक्यात घालून रील तयार करत आहेत. दोन तरुणांनी दोरी पकडलेली दिसत आहे. त्यातील एक तरुणाच्या हातून दोरी सुटते आणि तो प्रचंड प्रवाहाने वाहत असलेल्या पाण्यात वाहत जातो आणि १५० पेक्षा जास्त फुटावरून खाली पडतो. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडिओ -
कन्हैयालाल बैरवा आणि अक्षत धोबी हे दोघे मित्रासोबत मेनल धबधब्यावर पिकनिकसाठी गेले होते. यावेळी दोघांनीही रील बनवण्यास सुरुवात केली. दोरीला पकडून ते धोकादायक ठिकाणी रील शूट करत होते. पण त्याचवेळी त्यांचा तोल गेला आणि दोन्ही मित्र धबधब्यात वाहू लागले. यावेळी त्यामधील एका तरुणांनी तेथे पडलेल्या साखळदंडाला पकडले. त्यामुळे अक्षतला तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी कसा तरी वाचवला. पण २० वर्षीय कन्हैयालाल बैरवा हा पाण्यासोबत वाहून गेला. तो १५० फूट खोल दरीत कोसळला अन् मृत्यू झाला.
दरम्यान, मैनाल धबधब्यावर हा पहिलाच अपघात घडला नाही. आठवडाभरात या धबधब्यावर चार दुर्दैवी घटना घडल्या आहेत. प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. तरीही उत्साही पर्यटकांकडून धोकादायक रील शूट करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.