Worli Hit And Run: मोठी बातमी! वरळी हिट ॲण्ड रन प्रकरणातील आरोपीला अटक!

Worli Accident News: वरळीमधील घडलेल्या अपघातासंदर्भातील एक मोठी बातमी समोर आली आहे. हिट ॲण्ड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाहाला अखेर अटक करण्यात आलीये.

वरळीमध्ये कारने अपघात करणारा मिहीर शाहाला अखेर अटक करण्यात आली आहे.अपघातानंतर मिहीर शाह फरार होता.दरम्यान शहापूरमधून पोलिसांना अखेर आरोपीला पकडण्यात यश आलं आहे. वरळीमध्ये झालेल्या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता. वरळीमध्ये बीएमडब्यू गाडीने एका दुचाकीला धडक दिली होती. दरम्यान या अपघातात एका महिलेला तिचा जीव गमवावा लागला होता. या प्रकरणात आता मिहीर शाहाला अटक झाली असून अनेक धागे-दोरे अनेक पुरावे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com