Corona Virus: जगावर पुन्हा कोरोनाचं संकट? २२ देशांमध्ये पसरला नवा व्हेरिएंट

COVID new wave global alert 22 countries update: कोरोनाने पुन्हा एकदा जगाचे टेन्शन वाढवलं आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट वेगाने पसरत आहे. २२ देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

जग अजूनही COVID-19 च्या परिणामातून पूर्णपणे सावरलेले नसताना आता जगावर पुन्हा एकदा नव्या महामारीचं संकट घोघावत आहे. अमेरिकत सध्या कोरोनाचा एक नवीन विषाणू वेगाने पसरत असून, शेकडो रुग्ण आढळून आलेय. BA.3.2 असं ह्या नव्या व्हेरिएंटच नाव असून, अमेरिकेतील निम्म्या राज्यांसह, इतर २२ देशांमध्ये या विषाणूनं धूमाकूळ घालायला सुरूवात केलीये. संशोधकांनी या व्हेरियंटला 'सिकाडा' असे नाव दिले आहे. कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटमुळे जगावर पुन्हा एकदा नव्या महामारीचे संकट गडद झाले आहे. कोरोनाच्या रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. यामुळे अद्याप बिकट परिस्थिती निर्माण झाली नसली तरी देखील कोरोना वेगाने पसरत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्या त्या देशातील सरकारकडून युद्धपातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com