Manoj Jarange: जरांगे हत्या कट प्रकरणात नवा ट्विस्ट; अटक आरोपीची पत्नी आणि आईचा गंभीर आरोप|VIDEO

New Angle Emerges in Jarange Conspiracy: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या हत्येच्या कटप्रकरणी आरोपी अमोल खुणेच्या पत्नीने धक्कादायक दावा केला माझ्या पतीला दारू पाजून अडकवलं.” जालना पोलिसांनी केलेल्या अटकेनंतर प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण.

माझ्या हत्येचा कट रचला गेला असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेतून केला. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती.याप्रकरणी गेवराई येथून जालना पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.गेवराई तालुक्यातील धानोरा येथील अमोल खुणे याची अटकेत समावेश आहे. मात्र मागील एक महिन्यापासून माझ्या पतीला दारू पाजत होते. त्या नशेमध्ये त्यांच्याकडून हे सगळं करून घेतलं जात होतं. मात्र माझे पती मराठा आंदोलक जरांगे पाटलांचे सुरुवातीपासून कार्यकर्ते आहेत. त्यांच्या मोबाईलमध्ये आणि स्टेटसला नेहमी जरांगे पाटलांचे फोटो असतात. ते जरांगे पाटलांना देव मानतात. माझ्या पतीला या प्रकरणात अडकवलं जातंय. त्यांचा काहीही संबंध नाही. असा धक्कादायक दावा आरोपी अमोल खुणे याची पत्नी आणि आईने केला आहे.त्यामुळे या प्रकरणात ट्विस्ट निर्माण आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com