Politics Video : राज ठाकरेंनी शिवसेना का सोडली? उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप करत एकनाथ शिंदेंनी सांगितलं कारण

Raj Thackeray - Uddhav Thackeray : राज ठाकरेंनी शिवसेना का सोडली याचं कारण एकनाथ शिंदे यांनी सांगितलं असून, उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ANI वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडण्यामागे उद्धव ठाकरे असल्याचं त्यांनी म्हटले आहे. राज ठाकरेंनी शिवसेना सोडावी, अशी बाळासाहेबांची इच्छा नव्हती, असा खुलासाही एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंमध्ये विस्तवही जात नाही. दोघेही विविध कार्यक्रमांमधून एकमेकांवर थेट शाब्दिक हल्ला चढवतात. अनेकदा दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतात. आता एकनाथ शिंदे यांनी पुन्हा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. राज ठाकरे यांनी शिवसेना का सोडली याबाबत शिंदेंनी गौप्यस्फोटच केला आहे. उद्धव ठाकरे यांच्यामुळेच राज यांनी शिवसेना सोडली, असं त्यांनी मुलाखतीत सांगितलं. राज ठाकरे हे त्या पदासाठी पात्र होते, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com