VIDEO: वंचितची साथ सोडून ठाकरे गटात जाण्याचा निर्णय का घेतला?, Vasant More यांनी थेटचं सांगितलं
विधान परिषद निवडणुकींच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. वंचितचे वसंत मोरे हे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. येत्या ९ जुलै रोजी वसंत मोरे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. यादरम्यान त्यांनी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय का घेतला यासंदर्भात साम टीव्हीला प्रतिक्रिया दिली आहे. मी पूर्वीपासूनच शिवसैनिक आहे म्हणूनच पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असं वसंत मोरे यांनी सांगितलं नऊ जुलै रोजी कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधणार असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रकाश आंबेडकर यांचा फोन आला होता मात्र या गोष्टीला उशीर झाला, लोकसभा निवडणुकीत बऱ्याच लोकांनी काम केलं नाही त्यामुळे माझे कार्यकर्ते देखील नाराज होते असं वसंत मोरे म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांच्याशी या संदर्भात चर्चा झाल्याचंही वसंत मोरे म्हणाले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.