VIDEO: Sambhaji Raje Chhatrapati यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यातील दहशतवादी नेमका आहे तरी कोण?
विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात आंदोलन केल्याप्रकरणी संभाजी राजे छत्रपती यांच्यासह ५० ते ६० शिवभक्तांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संभाजीराजे छत्रपती यांना अटक करा अशी मागणी मुस्लीम समाजाकडून करण्यात येत आहे. विशाळगडाच्या पायथ्याशी झालेल्या तोडफोडीबद्दल कोल्हापूर जिल्ह्यातील मुस्लीम समाजाकडून तिव्र निदर्शने करण्यात येत आहेत. यादरम्यान दहशतवादी यासिन भटखळ सहा दिवस विशाळगडावर होता असा खळबळजनक दावा संभाजीराजे यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. यासिन भटखळ हा नेमका कोण होता? यासिन भटखळ ऊर्फ मोहमद अहमद सिद्धीबापा असे त्याचे पूर्ण नाव असून देशातील सुरक्षायत्रणांसाठी यासिन मोस्ट वॉंटेड दहशतवादी होता. दहशतवादी संघटनांमध्ये तंत्रज्ञानाची माहिती असणारा हा एकमेव सदस्य होता. बॉम्ब तयार करणाऱ्यांना यासिन स्वतः मार्गदर्शन करायचा. बॉम्बस्फोट घडवून आणण्यापूर्वी यासिन स्वतः त्या स्थळी जायचा. दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण यासिनने पाकिस्तानमधून घतले. हा आरोपी विशाळगडावर असल्याचा खळबळजनक दावा संभाजी राजे यांनी केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.