Freight Train Derailed : पश्चिम रेल्वेवर पुन्हा मालगाडीचे डबे रुळावरून घसरले, घटनेनंतर प्रशासनाची धावाधाव,VIDEO

freight train derailed today :पश्चिम रेल्वेवर पुन्हा मालगाडीचे डबे रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर रेल्वे प्रशासन आणि पोलिसांची एकच धावाधाव झाली.

पालघर : पालघरमधून मोठी बातमी समोर आली आहे. पश्चिम रेल्वेवर पुन्हा मालगाडीचे डबे घसरल्याची घटना घडली आहे. पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे ४ डबे रुळावरून घसरले आहेत. या घटनेनंतर एकच रेल्वे प्रशासनाची एकच धावाधाव झाली.

पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे स्थानकाजवळ माल गाडीच्या मागच्या भागातून चार डबे रुळावरून घसरले. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेनंतर रेल्वे कर्मचारी आणि रेल्वे प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. बोईसर रेल्वेस्थानकाच्या यार्डमध्ये माल खाली करण्यासाठी माल गाडी आली होती. पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर काहीही परिणाम झालेला नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com