India Pakistan War: पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक! सलाल धरणाचे दरवाजे उघडले

Water Strike: भारताने दोन्ही धरणांचे सर्व दरवाजे एकाच वेळी उघडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी सोडले गेले आहे, ज्यामुळे जलस्तर वाढण्याची आणि संभाव्य पुरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा धक्का दिला आहे. भारतानं चिनाब नदीवरील रियासी येथील सलाल धरणाचे तीन दरवाजे उघडले आहेत. याआधी सिंधू जलकरार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानकडे जाणारे पाणी रोखण्यात आले होते. आता सलाल धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये पूर येण्याची शक्यता वाढली आहे. यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची आणि पुराचे संकट निर्माण होण्याची आशंका आहे.

पाकिस्तानकडून अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर, भारताने बगलिहार आणि सलाल धरणांचे दरवाजे उघडले आहेत, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी विसर्गित होईल. यामुळे पाकिस्तानच्या किनारपट्टीवर पुरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. हवाई हल्ल्यानंतर आता भारताने वॉटर स्ट्राईकचा मार्ग स्वीकारल्याने पाकिस्तानात पुराचा धोका वाढला आहे.

जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे, पण सिंधु जल करार भारताने रद्द केला आहे. त्यामुळे पाकिस्तानला याबाबत कोणतीही पूर्वसूचना देण्याची भारताची बांधिलकी नाही. परिणामी, भारताने बगलिहार आणि सलाल धरणांचे दरवाजे उघडले आहेत, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये जलविहार आणि पुरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com