Video: वीर धरणातून सोडलेले पाणी पंढरपुरात पोहचले
Pandharpur Rain Updates: वीर धरणातून सोडलेले पाणी आज पहाटे पंढरपुरात पोहचले. चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. नदीतील भक्त पुंडलिक मंदिरासह इतर सर्व मंदिरांना पाण्याचा वेढा पडला आहे. दोन दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने वीर धरणातून सुमारे 80 हजार क्युसेक पाणी नीरा नदीत सोडले आहे. संगम येथे नीरा नदी भिमा नदीला मिळते. त्यामुळे भीमा नदी सध्या दुथडी भरून वाहू लागली आहे. पंढरपुरातील चंद्रभागेच्या घाटापर्यंत पाणी आले आहे. शहराला पाणी पुरवठा करणारा बंधारा ही पाण्याखाली गेला आहे. आज दुपारपर्यंत सोलापूर मार्गावरील जूना दगडी पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.