Maharashtra Water Crisis| पाणीटंचाईच्या बैठकीला मंत्र्यांची दांडी!

आज मराठवाड्याच्या पाणी टंचाईवर संभाजीनगरमध्ये आढावा बैठक पार पडली. या दुष्काळाच्या बैठकीत अनेक नेते मंडळी गैरहजर होते. काही मंत्री विदेशात तर काही देवदर्शनासाठी राज्याबाहेर गेल्याची माहिती मिळतेय.

Water Crisis | आज मराठवाड्याच्या पाणी टंचाईवर संभाजीनगरमध्ये आढावा बैठक पार पडली. या दुष्काळाच्या बैठकीत अनेक नेते मंडळी गैरहजर होते. काही मंत्री विदेशात तर काही देवदर्शनासाठी राज्याबाहेर गेल्याची माहिती मिळतेय. कृषी मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे विदेशात जाण्याच्या तयारीत होते. अल्पसंख्यांक मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार परदेशात आहेत. गृहनिर्माण मंत्री तथा जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे देखील देवदर्शनासाठी संभाजीनगर जिल्ह्याच्या बाहेर होते. परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे देवदर्शनासाठी राज्यबाहेर होते. बैठकीसाठी ते ऑनलाईन उपस्थित राहणार होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com