Wadigodri Fight Video : वडीगोद्रीतील वादाचा नवा व्हिडिओ आला समोर; पोलिसांच्या मध्यस्थीमुळे मोठा अनर्थ टळला

Wadigodri Latest News : वडीगोद्रीत ओबीसी आणि मराठा आंदोलकाच्या वादाचा व्हिडिओ हाती आली आहे. या एका गटाकडून आंदोलकांना मारहाण केली जात आहे.
वडीगोद्रीत वादाचा नवा व्हिडिओ आला समोर; पोलिसांच्या मध्यस्थीमुळे मोठा अनर्थ टळला
Wadigodri Fight Video Saam tv
Published On

जालना : जालन्यातील अंतरवाली सराटी फाट्यावरील वडीगोद्री येथे तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. या ठिकाणी मराठा आणि ओबीसी आंदोलकांचा आमने सामने येऊन घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आहे. या भागात पोलिसांकडून तगडा बंदोबस्त असतानाही मराठा आणि ओबीसी आंदोलक सामने येत आहेत.

याच वडीगोद्रीत मारहाण झाल्याची घटना घडली. या भागात मराठा आणि ओबीसी कार्यकर्ते भिडले. एका गटाने घोषणाबाजी केल्याने दुसऱ्या गटाने मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे. मारहाणीच्या घटनेनंतर पोलिसांनी मध्यस्थी केली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com