Video: भाजपकडून मुंबई संपवण्याचा कट?Vinayak Raut यांचा गंभीर आरोप! पाहा व्हिडीओ..

Vinayak Raut On BJP News: धारावी पूर्नवसनावरुन विनायक राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. भाजप हे मुंबई संपवण्यासाठी प्रयत्न करतंय,असा गंभीर आरोप राऊतांनी भाजपवर केलाय.

भाजपकडून मुंबईला उद्धवस्त करण्याचं कारस्थान सुरु आहे,असा गंभीर आरोप विनायक राऊतांनी केला आहे. दरम्यान त्याच संदर्भात पदाधिकारी मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं. मुंबईत मराठी माणसाचे अस्तित्व संपवून संपूर्ण धारावी ही अदानींना देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सर्व सरकारी जागा ह्या अदानींच्या घशात घालण्याचा देखील प्रयत्न सुरुये असा घणाघात विनायक राऊतांनी माध्यमांशी संवाद साधताना केला आहे. धारावीला वाचविण्यासाठी मुंबई रक्षण समिती स्थापन करण्याच्या सूचना उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांनी मेळाव्यात दिल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com