Video: बदलापुरातील क्रूर घटना, कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न- विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar on Badlapur Case: बदलापूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. 2 चिमुरड्यांवर अतिप्रसंग करण्यात आला. त्या घटनेच्या निषेधार्थ सर्व बदलापूरकर संतापले असून, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील यावर मोठी प्रतिक्रिया दिलीये.

बदलापूरमध्ये अतिशय क्रूर अशी घटना घडलीये. सर्व बदलापूरकर रस्त्यावर उतरलेत. गेल्या साधारण 2 तासांपासून रेलेरोको आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला आहे. बदलापुरातील सर्व वातावरण हे तापलं आहे. आंदोलनकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेत. रेल्वे ट्रॅकवरुन बाहेर येण्यास तयार नाहीत. पोलिसांकडून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान त्याच घटनेवर विरोधी पक्षनेते विजय विडेट्टीवार यांनी देखील मोठी प्रतिक्रिया दिलीये. यावेळी त्यांनी कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला जातोय. गृहखातं काय करतंय? पोलिसांचा धाक नाही का? असे सवाल वडेट्टीवारांनी यावेळी विचारलेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com