Vijay Wadettiwar News : सरकारडून दोन समाजात दरी निर्माण केली जाते? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप

विधानसभेत आज मराठा आरक्षणावरून वाद झाला. त्यामुळे कामकाज तहकूब करावे लागले.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की अचानक मराठा आणि ओबीसी मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक बोलावली. अधिवेशन सुरू असताना ही बैठक का बोलावली. चोरून लपवून ही बैठक का बोलावली असा सवाल वडेट्टीवार यांनी विचारला. तसेच दोन्ही समजातील वाद मिटेल अशी भूमिका सरकारने घ्यावी. पण दोन सामाजात दरी निर्माण केली जात आहे. सरकार स्वतःचे पाप लपवण्यासाठी हे कृत्य करत असल्याचा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. वरळी हिट अँड रन प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. पण सरकार हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे. पब आणि बार पहाटे पाच वाजेपर्यंत सुरूच राहतात असेही वडेट्टीवार म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com