Vidhan Sabha Election : मुंबईवरून मविआमध्ये रस्सीखेच? ३६ जागांवरून खलबतं, पाहा VIDEO

MVA Seat Sharing Crisis In Mumbai : विधानसभेसाठी जागावाटपावरून मविआमध्ये रस्सीखेच सुरू आहे. मुंबईतील ३६ जागांवरून खलबतं सुरू असल्याची माहिती मिळतेय.

मुंबई : महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात मोठं अपडेट समोर आलंय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपावरून महाविकास आघाडीमध्ये खलबतं सुरू असल्याचं समोर आलंय. मुंबईपैकी ३६ जागांपैकी काही जागांवर महाविकास आघाडीमधील तिन्ही घटक पक्षांनी दावा केलाय. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने २२ तर कॉंग्रेस १८ जागांवर दावा करत आहे. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला ७ जागा हव्या असल्याची माहिती मिळत आहे.

परंतु मुंबईतील ५ जागांवर आघाडीमधील कोणत्याही नेत्याने अद्याप दावा केलेला नाहीये. या पाचही जागांवर विद्यमान आमदार भाजपचे आहेत, त्यामुळे पराभवाच्या भितीने मविआतील कोणत्याच पक्षाने या जागांवर दावा केलेला नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये महाविकास आघाडीत कोणत्या जागा, कोणत्या घटक पक्षाला जातात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com