Video: महिला उमेदवारांना मागितले लग्नाचे पुरावे

वाडी येथील केंद्रावर काही महिलांनी लग्नानंतर बदललेल्या नावाचे आवश्यक कागदपत्र सोबत आणले नव्हते त्यामुळे त्या महिला उमेदवारांना केंद्रातून बाहेर काढण्यात आले.

Nagpur News: परीक्षा केंद्रावर महिला उमेदवारांना लग्नाचे पुरावे मागितले आणि महिला परीक्षेला मुकल्या. मेयो, मेडिकलसह शासकीय आयुर्वेदिक आणि दंत रुग्णालय मिळून 'गट ड' संवर्गातील 680 पदांच्या भरतीसाठी सोमवारी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. या पदभरतीसाठी जवळपास 95 हजार अर्ज आले होते. नागपुरात सुमारे 25 हजार उमेदवार असल्याने दहा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली. यात वाडी येथील केंद्रावर काही महिलांनी लग्नानंतर बदललेल्या नावाचे आवश्यक कागदपत्र सोबत आणले नव्हते त्यामुळे त्या महिला उमेदवारांना केंद्रातून बाहेर काढण्यात आले. या महिलांनी केंद्राच्या बाहेर गोंधळ घालत परीक्षा प्रक्रियेवरच आक्षेप घेतला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com