Pandharpur: श्री गजानन महाराज पालखीचं पातूर घाटातील सुंदर दृश्य; डोळ्यांचं पारणं फेडणारा ड्रोन VIDEO

Sant Gajanan Maharaj: विदर्भाची पंढरीनाथ समजल्या जाणाऱ्या श्री. संत गजानन महाराजांची पालखीचा आज अकोला जिल्ह्यातून वाशिमकडं रवाना झालीय.. याच श्रींच्या पालखीचे पातुर घाटातील विहंगम दृश्य.

विदर्भातील श्रद्धेचे प्रतीक मानले जाणारे श्री संत गजानन महाराज, ज्यांना विदर्भाचा पंढरीनाथ म्हटलं जातं, यांच्या पंढरपूरकडे निघालेल्या पालखी सोहळ्याचं आज वाशिमकडे प्रस्थान झालंय. काल पातूर शहरात झालेल्या मुक्कामानंतर, आज पहाटेच पालखी पातूर घाट पार करत पुढे वाशिम जिल्ह्यातील मेडशीकडे मार्गस्थ झाली. या दरम्यान पातूर घाटातलं विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद करण्यात आलं आहे.

ही पालखी यात्रा यंदाचं ५६वं वर्ष साजरं करत आहे. २ जून रोजी शेगाव येथून ही पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली. अकोला जिल्ह्यात २ ते ७ जूनदरम्यान ‘माऊली’च्या गजरात संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं होतं.

या पालखी यात्रेतील सर्वात मंत्रमुग्ध करणारा टप्पा म्हणजे पातूरचा घाट. याच ठिकाणी डोंगरदऱ्यांच्या कुशीतून पालखीचा मार्ग, भक्तांच्या हरिनाम संकीर्तनाचा गजर, आणि फुललेल्या निसर्गाच्या सानिध्यातील हे दृश्य ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेलं आहे. याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com