Video: नागपुरात विदर्भ राज्य आंदोलन समितीचं आंदोलन

दरम्यान नागपूर पोलिसांनी विधानभवनाच्या चारही बाजूला कडेकोट बंदोबस्त लावला आहे. यात काहींना रात्री डिटेन करण्यात आले होते.

Nagpur News: नागपुरातून एक मोठी बातमी समोर येते. नागपुरात विदर्भ राज्य आंदोलन समितीचं आंदोलन सुरू आहे. ऑगस्ट क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर आज नागपुरात विदर्भवाद्यानी लाँग मार्च आंदोलनाची हाक दिली आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून यशवंत स्टेडियम ते विधान भवन असा हा लॉंग मार्च काढण्यात आलाय. याच लॉंग मार्च पार्श्वभूमीवर काही तरुण विदर्भवाद्यानी नागपूरच्या विधानभवनावर स्वतंत्र विदर्भ राज्याचा झेंडा फडकवू असा इशारा दिला होता. दरम्यान नागपूर पोलिसांनी विधानभवनाच्या चारही बाजूला कडेकोट बंदोबस्त लावला आहे. यात काहींना रात्री डिटेन करण्यात आले होते. त्यानंतर आज पहाटे आंदोलकानातील काहींना सोडण्यात आले आहे. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसह वाढते वीजदर, शेतकऱ्यांची कर्जमाफी, स्मार्ट मीटरवर तात्काळ निर्णय घेण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी हा लॉन्ग मार्च काढला गेलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com