अमेरिकेने १०४ भारतीयांना परत पाठवलं आहे. १०४ स्थलांतरितांना घेऊन अमेरिकन लष्करी विमान बुधवारी अमृतसर विमानतळावर उतरलं. मात्र ज्यावेळी या विमानातून भारतीय प्रवासी बाहेर पडले, तेव्हा त्यांच्या हातात आणि पायात बेड्या होत्या. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. या विमानात हरियाणा आणि गुजरातमधील प्रत्येकी ३३, पंजाबमधील ३०, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील प्रत्येकी ३ आणि आणि चंदीगडमधील २ भारतीय होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थलांतरितांना मायदेशी पाठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर १०४ भारतीयांना घेऊन बुधवारी अमेरिकेचं लष्करी विमान अमृतसरच्या विमानतळावर दाखल झालं. यावेळी सर्व भारतीयांच्या हातात आणि पायात बेड्या घातलेल्या होत्या. त्यामुळे भारतीयांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.