Unseasonal Rain: खेडमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस; भीमा नदीला पूर, शेतीचे मोठे नुकसान, पाहा VIDEO

Summer flood : खेडच्या पश्चिम पट्याला पुन्हा अवकाळी पावसाने झोडपले असून भिमा नदीला उन्हाळ्यात पहिल्यांदाच पूर आला आहे. एका तासात तब्बल ७४ मी.मी. पावसाची नोंद झाली आहे.

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुणे जिल्हयातील खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यात सर्वदूर अवकाळी पावसाने दाणादाण उडवली असून ढगफुटी प्रमाणे झालेल्या पावसाने जनजिवन विस्कळीत केले, सहा दिवसांत सलग पाच वेळा अवकाळी पावसाने दमदारपणे हजेरी लावली, भिमा नदिला उन्हाळ्यात पहिल्यांदाच पुर पाहायला मिळाला, चास-कमान धरण परिसरात एका तासात तब्बल ७४ मी.मी. पावसाची नोंद झाली आहे.

खेडच्या पश्चिम पट्यात गेली काही दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसाने जनजिवन विस्कळीत केले असून शेतांचे बांध फुटले, पिके गाडली गेली, कापणीस आलेली बाजरीची पिके भुईसपाट झाली, उन्हाळी भुईमुगासह काढणीला आलेल्या कांद्याचे मोठे नुकसान झाले असून मका पिकासह अनेक उन्हाळी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

ढगफुटी प्रमाणे झालेल्या पावसाने सगळ्यात जास्त नुकसान केले. दुपारच्या वेळेत संध्याकाळप्रमाणे अंधारून आले व काही वेळातच सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाला सुरूवात झाली. पावसाचा जोर एवढा होता की समोरचे काहीही दिसत नव्हते. कडधे, कान्हेवाडी, कमान, पापळवाडी, बहिरवाडीस मिरजेवाडी यांसह अन्य परिसरातील व प्रामूख्याने डोंगरच्या पायथ्यांच्या भागात मुसळधार पावसाने ओढ्या नाल्यांना पुर आल्याने पुराचे पाणी थेट शेतात घुसले व शेतांचे बांध फुटले, पिके वाहून गेली, वैरण वाहून गेली, काढून साठवून ठेवलेल्या कांद्यामध्ये पाणी साचल्याने मोठे नुकसान झाले. कमान येथे ओढ्याच्या पुराचे पाणी शिरूर-भिमाशंकर मार्गावर आल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com