Udhhav Thackrey : ठाकरे महायुतील उद्या धक्का देणार ?

Shivsena Thackrey Group : रविवारी उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरचा दौरा करणार आहेत. यावेळी ते पैठण आणि वैजापुर मंतदारसंघातून शिंदे सेनेला आणि भाजपला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं बघायला मिळत आहे.

रविवारी उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यादारम्यान ठाकरे वैजापुर आणि पैठणमध्ये महायुतील धक्का देतील का? अशा चर्चा सध्या परिसरात बघायला मिळत आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील पैठणचे संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सचिन घायाळ हे ठाकरे गटात उदय प्रवेश करणार आहेत. तर याच साखर कारखान्यातील विविध विकासकामांचं भूमीपूजनही उद्धव ठाकरे उदय करणार आहेत. शिंदेच्या शिवसेनेचे खासदार संदिपान भूमरे यांच्या मतदारसंघात उबाठा गटाचा भव्य सभा मंडप टाकण्यात आला आहे. त्यामुळे आता विधानसभेच्या तोंडावर संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिंदे गटाला धक्का बसेल का? याबाबत राजकीय गोटात चर्चा सुरू झाली आहे. लोकसभेला ठाकरे गटाचा या मतदारसंघातून पराभव झाला होता. मात्र आता उद्धव ठाकरे विधानसभेत पैठण आणि वैजापुर मंतदारसंघातून शिंदे सेनेला आणि भाजपला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं बघायला मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com