VIDEO : उद्धव ठाकरे यांच्यावर अॅजियोग्राफी होणार ? तब्बेत खालवल्याने रुग्णालयात दाखल
शिवसेना उबाठा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे सकाळी 8 वाजल्यापासून गिरगाव येथिल रिलायन्स हरकिशन दास रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्या हृदयात ब्लॉकेज असण्याची शक्यता वर्तवली जात असून त्यांच्यावर अॅजियोग्राफी होण्याची शक्यता देखील सूत्रांनी वर्तवली आहे.
उद्धव ठाकरे आज सकाळी आठ वाजल्यापासून एच एन रिलायन्स रुग्णालयात चेक अपसाठी दाखल झाले आहेत. हृदयामधील हार्ट ब्लॉकेज चेकअपसाठी रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांची अँजिओग्राफी होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपासून ठाकरे यांना त्रास जाणवत होता, त्यामुळे ते रुग्णालयात दाखल झाले आहे. त्यानंतर त्यांच्या हृदयात ब्लॉकेज असण्याची शक्यता असल्याने आता त्यांच्यावर अॅजियोग्राफी केली जाऊ शकते असं सांगण्यात आलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.