VIDEO : '23 तारखेला गुवाहाटीत जाऊन झाडी-डोंगर मोजा'; ठाकरेंची शहाजी बापूंवर नाव न घेता टीका

Udhav Thackarey : सांगोला येथे आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रचार सभा झाली. यावेळी त्यांनी काय झाडी काय डोंगर म्हणत शहाजी बापू यांच्यावर नाव न घेता खोचक टीका केली आहे.

मागच्या वेळी आपण एकावर विश्वास ठेवला होता. मात्र त्यांनी गद्दारी केली. काय झाडी, काय डोंगर म्हणत गेले तिकडे. गुवाहाटीला जाऊन मोजत बसा झाडं, तिकडचे डोंगर तुम्हाला माहीत आहेत, पण इथले टकमक टोक तुम्हाला माहीत नाही, अशी खोचक टीका यांनी उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता शहाजी बापू पाटील यांच्यावर केली आहे. सांगोला येथे आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. आपल्या भाषणातून ठाकरेंनी भाजप आणि महायुती सरकारवर जोरदार टीका केली. रेल्वेमध्ये कोणाची ओळख आहे का? आपल्याला एकच तिकीट बूक करायचं आहे 23 तारखेचे. गुवाहाटीला जाऊन झाडं मोजत बसा, असंही यावेळी ठाकरे म्हणाले.

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, 'आमची मशाल आता पेटली आहे. धगधगते आहे. जनता आमची वाट बघत आहे. गद्दारीचा वार फक्त यांच्यावर नव्हता, हा वार महाराष्ट्रावर केला आहे', असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. दरम्यान, यावेळी बोलताना ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना 'सर्किट' म्हणून टोला लगावला आहे. 'मुन्नाभाई चित्रपटात जसा सर्किट आहे, तसंच हे अमित शहा आहेत, असे म्हणत अमित शहांना टोला लगावला आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही आणि हे 370 हटवला, राम मंदिर बांधले सांगतात. याचा महाराष्ट्रातल्या माझ्या शेतकऱ्यांना काय उपयोग आहे? हमीभाव मिळणार आहे का 370 हटवून? असा प्रश्न देखील उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना विचारला.

Edited By Rakhi Rajput

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com