VIDEO: 'माझा पक्ष चोरुन विजयी झालात' Uddhav Thackeray यांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा

Uddhav Thackeray On Eknath Shinde: छत्रपती संभाजीनगर मध्ये उद्धव ठाकरे यांचा शिवसंकल्प मेळावा, यादम्यान शिंदेगटावर हल्लाबोल

छत्रपती संभाजीनगर मध्ये शिवसंकल्प मेळाव्यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी भाषण केले यादम्यान त्यांनी शिंदेगटावर हल्लाबोल केला आहे. शिंदेंना विजय मिळाला तो खरा विजय नाही, तुम्ही आमचं धनुष्यबाण चोरलं पक्ष चोरला आणि माझ्या वडिलांचा फोटोही चोरला असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. सरकारने ज्या योजना काढल्या आहेत त्या विधानसभा निवडणुकीत आपली पाप लपवण्यासाठी काढल्या आहेत असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. काही लोकांना वाटतं गद्दार झालो तरी चालेल पण खुर्ची गेली नाही पाहिजे मात्र मला असं वाटतं खुरची गेली तरी चालेल पण मी गद्दार होणार नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी खरमरीत टोला लगावला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com