Video
Video: सातपुड्यातील उदय नदीने ओलांडली धोक्याची पातळी
महिला आणि लहान बालकांचा पुलावरून जीवघेणा प्रवास सुरू आहे. उदय नदीच्या पुलावरून पाणी जात असल्याने वाहतुकीसाठी पूल बंद करण्यात आलाय.
हवामान खात्याने दिलेल्या रेड अलर्टनंतर नंदुरबार जिल्ह्यात तुफान पाऊस. सातपुड्यातून वाहणाऱ्या उदय नदीने धोक्याची पातळी ओलांडलीये. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव आणि तळोदा तालुक्यांचा संपर्क तुटलाय. दोन तालुक्यांना जोडणाऱ्या उदय नदीवरील पालखा गावाजवळील पुलावरून पुराचं पाणी वाहतंय. पुलावरून पाणी जात असताना देखील नागरिकांचा जीव धोक्यात घालून प्रवास सुरू असल्याचं पहायला मिळतंय. महिला आणि लहान बालकांचा पुलावरून जीवघेणा प्रवास सुरू आहे. उदय नदीच्या पुलावरून पाणी जात असल्याने वाहतुकीसाठी पूल बंद करण्यात आलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.