Nashik Rain: त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी डोंगरावर दगड कोसळला; नवविवाहित दाम्पत्यासह तीन भाविक गंभीर जखमी|VIDEO

Rockfall accident in Brahmagiri Hills: त्र्यंबकेश्वरजवळील ब्रह्मगिरी डोंगरावर मंगळवारी दगड कोसळून तीन भाविक जखमी झाले.

नाशिक येथील त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी पर्वतावर जाताना लगतच्या डोंगरावरून दगड पडल्याने तीन भाविक जखमी झाले. मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास विशाल प्रतापसिंह गिरासे आणि जयश्री विशाल गिरासे या नवविवाहित दाम्पत्याला गंभीर दुखापत झाली. यातील जयश्रीच्या हातावर दगड पडल्याने त्यांचा हात फॅक्चर झाला, तर विशाल यांच्या डोक्यावर खोक पडली व हाताला गंभीर दुखापत झाली. त्याचवेळी तेथे असलेल्या नेहा डावरी यांच्या हाताच्या बोटाला दुखापत झाली. या घटनेवेळी काही भाविक थोडक्यात बचावले.

ब्रह्मगिरी किल्याच्या मुख्य पायऱ्यांनी जाताना डाव्या बाजूला असलेला डोंगरकडा तुटला आहे. तेथे निखळलेले दगड उतारावर जमा झाले आहेत. धबधबा असलेल्या या ठिकाणी माकडांची धावपळ झाल्यास दगड खाली घसरून पडतात. यापूर्वी देखील त्याच ठिकाणावर दगड पडले आणि एका भाविकाचा जीव गेला होता, आणि काही भाविक जखमी झाले होते. त्याच जागेवर पुन्हा ही घटना घडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com