Chandrakant Khaire VIDEO: कोणत्याही परिस्थितीत गद्दारांना पाडायचं, खैरेंचा रोख कोणावर?

Chandrakant Khaire News: संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळाव्यात चंद्रकांत खैरे यांनी भाषण केलं, यादरम्यान त्यांनी राजु शिंदेंच ठाकरे गटात स्वागत केलं आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा पार पडला. यादम्यान चंद्रकांत खैरे यांनी भाषण केले आहे. मेळाव्यादरम्यान राजू शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश केला. यादम्यान ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी भाषण केले आहे. राजू शिंदे अगोदर शिवसेनेत आला असता तर मी 35 हजारांच्या लिडने निवडून आलो असतो, पण आता आलात तरी स्वागतच आहे, अजून पुढे खूप काम करायचे आहे असं म्हणत खैरेंनी राजु शिंदे यांचं स्वागत केलं आहे. कोणत्याही परिस्थितीत गद्दारांना पाडायचं आहे. असं म्हणत खैरे यांनी संजय शिरसाठ यांना टोला लगावला आहे. आमच्यात गटबाजी नाही, आम्ही एकजुटीने उध्दव ठाकरे यांच्यासाठी काम करत असल्याचं चंद्रकांत खैरे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com