Video : टिळकपूल वाहतुकीसाठी बंद, पुणेकरांना सतर्क राहण्याचं आवाहन

Pune Rain News : पुण्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिके समोरील टिळकपूल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला.

पुण्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे पुणे महानगरपालिकेच्या नवीन इमारती समोर असलेला टिळक पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. सुरक्षिततेच्या कारणामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. खडकवासला धरणातून सायंकाळी 5 वाजता पाणी विसर्ग 45 हजार क्यूसेक्सने वाढवण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेसमोर असणारा पूल वाहतूक करण्यासाठी बंद केला. पुराचं पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी येथे गर्दी केली आहे. पुण्यातील अनेक सखोल भागात खडकवासला धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे पाणी साचलं आहे. यामुळे प्रशासनाने योग्य ती खबरदारी ही घेतली आहे. तसेच आजूबाजूच्या भागाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com