VIDEO : गावात रस्ताच नाही! पुण्याच्या वेहळदरात वृद्धांसह, विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

Pune News : पुण्याच्या वेहदळरा गावात रस्ता नसल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून ओढ्याच्या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे, राजकीय नेत्यांसह प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांची तारेवची कसरत सुरू आहे.

पुण्याच्या वेहळदरा गावात रस्ता नसल्याची मोठी बाब समोर आली आहे. गावात रस्ता नसल्याने शाळकरी विद्यार्थ्यांसह गावातील अबाल वृद्धांवर ओढ्याच्या पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करण्याची वेळ आली आहे. कोट्यावधी रूपयांच्या वल्गना करून देखील राजकीय नेते आणि प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं पाहायला मिळत आहे... याआधी देखील गावात रस्ता नसल्याने अनेक गावात गर्भवती महिला,आजारी वृद्धांना झोळीतून घेऊन दवाखान्यात घेऊन जाण्याचे प्रकार उघडकीस आले होते, या घटनांनंतर देखील प्रशासनाला जाग केव्हा येणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान वेहळदरा गावातील ग्रामस्थ तात्काळ रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com