VIDEO: किल्ले शिवनेरीवर तटबंदीचा कडा कोसळला! 'या' तारखेपर्यंत पर्यकांना किल्ल्यावर प्रवेश मिळणार नाही..

Shivneri Fort News: किल्ले शिवनेरीचा कडा कोसळला, ३१ जुलै पर्यंत पर्यटकांना किल्ल्यावर जाण्यास बंदी.

राज्यभरात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते खचणे, दरड कोसळणे अशा अनेक घटना घडत आहेत, अशातच किल्ले शिवनेरीची कडा कोसळल्याची माहिती समोर येत आहे, किल्ले शिवनेरीच्या गणेश दरवाजाच्या वरील बाजुचा कडा खाली कोसळला असून भातखळा तटबंदीचाही काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. ३१ जुलै पर्यत पर्यटकांना किल्ल्यावर जाण्यास बंदी आहे. सुदैवाने सदर घटनेत मोठी दुर्घटना टळली आहे. किल्ले शिवनेरीवर येत असाल तर किल्ल्यावर कडा कोसळण्याचा धोका अधिक आहे त्यामुळे किल्ले शिवनेरीवर येणाऱ्या पर्यटकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन जुन्नर वनविभागाने केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com