Thane Rain: ठाण्याला पावसाचा रेड अलर्ट, उद्याही सर्व शाळांना सुट्टी

Thane School Holiday Due To Rain: उद्या देखील ठाण्याला पावसाचा रेड अलर्ट हवामान खात्याकडून जारी करण्यात आला आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना आणि महाविद्यालयांना उद्या देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे ठाण्यामध्ये शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली होती. उद्या देखील ठाण्याला पावसाचा रेड अलर्ट हवामान खात्याकडून जारी करण्यात आला आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना आणि महाविद्यालयांना उद्या देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पालकांनी उद्या देखील आपल्या मुलांना शाळेमध्ये पाठवू नये. ठाण्यामध्ये पावसाची परिस्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासन देखील सतर्क झाले आहे. मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता ठाणेकरांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com