Thailand-Cambodia War: थायलंड-कंबोडिया सीमावाद चिघळला; हवाई हल्ल्यांसह लष्करी संघर्षात ९ नागरिकांचा बळी|VIDEO

Thailand Cambodia Border War: थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील सीमावाद भीषण रूप घेत आहे. मुएन थॉम मंदिर परिसरात चकमकी सुरू असून थायलंडकडून कंबोडियावर हवाई हल्ले करण्यात आले.

थायलंड आणि कंबोडिया या दोन देशात मोठा तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांशी युद्ध करत असून या हल्ल्यात 9 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या युद्धात आता एअर फोर्स मैदानात उतरली आहे. थायलंड आणि कंबोडियामध्ये सीमावादाने हिंसक वळण घेण्याची ही पहिलीच वेळ आहे असे नाहीये. पण यावेळी हे युद्ध मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दोन्ही देशाचे सैन्य संपूर्ण ताकदीने आमने-सामने आहे.

रशिया युक्रेन आणि इस्रायल पॅलेस्टाईन यांच्यातील युद्धानंतर आणखी एका युद्धाला सुरुवात झाली आहे. थाई सैन्याने कंबोडियातील लष्करी तळांवर हवाई हल्ले सुरू केल्याचीही माहिती मिळत आहे. थायलंडच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला आहे की दोन देशांच्या सीमेवर किमान 6 ठिकाणी चकमकी सुरू आहे. या चकमकींची सुरुवात गुरुवारी सकाळी थायलंडच्या सूरीन प्रांत आणि कंबोडियाच्या ओद्दार मीनची सीमेवर असलेल्या मुएन थाॅम मंदीर परिसरात झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com