Video: महाराष्ट्रातील राजकारणातील मोठी दृश्य! ठाकरे -फडणवीस एकत्र; चर्चा काय?

Uddhav Thackeray- Devendra Fadnavis Meet: एक मोठी बातमी समोर आली आहे.विधान भवनात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.दरम्यान दोघांमध्ये लिफ्टच्या बाहेर चर्चा देखील झाली.

ठाकरे -फडणवीस भेट: पावसाळी अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळात हजेरी लावली. तेव्हा लिफ्टबाहेर ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. यावेळी दोन नेत्यांमध्ये चर्चाही झाली. दरम्यान ठाकरे-फडणवीस भेटीमुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.भाजप-ठाकरे गटात जवळीक वाढल्याचे चित्र दिसून आले.2019 पासून ठाकरे- फडणवीस हे दोन्ही नेते एकमेकांच्या विरोधात होते.आणि अचानक ठाकरे-फडणवीसांमध्ये एकत्र आल्याने आगामी विधानसभेसाठीची ही राजकीय समीकरणं असू शकतात,अशी शक्यता वर्तवली जात आहे.उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत जाणार नाहीत असं मोठं वक्तव्य केलं होतं.दरम्यान आजच्या भेटीनंतर ठाकरे-फडणवीस एकत्र येणार का? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com