राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत भाजपच्या वरिष्ठांशी बोलू, सुनील तटकरे बोलता बोलता बरंच काही सांगून गेले|VIDEO

What Sunil Tatkare Said About NCP-BJP Merger Discussions: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर सुनील तटकरे यांनी खुलासा केला असून सध्या अशी कुठलीही चर्चा नसल्याचे सांगितले. मात्र, काही घडल्यास भाजपच्या वरिष्ठांशी चर्चा केली जाईल, असेही ते म्हणाले.

मराठीच्या मुद्यावर राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आल्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि शरद पवार वेगवेगळ्या कारणांनी एकाच ठिकाणी येताना दिसत आहे.

यावरच आता राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांना विचारले असता ते म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाची चर्चा कुठेही सुरू नाहीये.कधीही झालेली नाहीये, माझ्या पर्यंत अशी कुठलीही माहिती पोहोचली नाहीये. विलिनीकारणाचा मुद्दा आज तरी खूप दूर दिसत असून माझ्यापर्यंत अशी कुठलीही माहिती नाही.

मात्र, तसा काही विषय झाला तर भाजपच्या वरिष्ठांशी चर्चा करू. आम्ही जेव्हा भाजपसोबत गेलो तेव्हा विचारलो आणि आता जर शरद पवार यांच्या सोबत किंवा विलिनीकरनाचा विषय निघाला तर भाजपच्या वरिष्ठांशी चर्चा करू, कारण ज्यावेळेस आम्ही वेगळा मार्ग घेतला होता तेंव्हा त्यांना विचारून निर्णय घेतला होता.असे सुनिल तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले. यावरच छगन भुजबळ म्हणाले, तटकरे हे राज्याचे अध्यक्ष आहे त्यामुळे त्यांनी ते वक्तव्य केले असेल, अस काही घडतंय का ते देखील पाहावं लागेल. तिघांनी एकत्रित सरकार बनवले आहे त्यामुळे एकमेकांना विचारावं लागेल असे भुजबळ म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com