Mumbai : मुंबईतील नेव्हल डॉकयार्डवर दहशतवादी हल्ल्याची धमकी, आंध्र प्रदेशमधून आला फोन

Mumbai Naval Dockyard terror threat call details : मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला नेव्हल डॉकयार्डवर दहशतवादी हल्ल्याची धमकी देणारा फोन आला. फोन आंध्रप्रदेशातून आल्यानंतर पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवले, मात्र काहीही संशयास्पद आढळले नाही. परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली असून तपास सुरू आहे.

Mumbai Police search operation after bomb threat : मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आलेल्या एका फोनमुळे खळबळ उडाली आहे. या फोनद्वारे मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड परिसरात दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली. प्राथमिक तपासात हा फोन आंध्र प्रदेशातून आल्याचे समोर आले असून, फोन करणाऱ्या व्यक्तीचे नाव जहांगीर शेख असल्याचे समजते. धमकीचा फोन आल्यानंतर मुंबई पोलिसांनी सतर्कता दाखवून त्याठिकाणी शोध मोहीम केली. मात्र त्यांच्या हाती काहीच मिळालेलं नाही. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ परिसराची तपासणी केली, परंतु कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. खबरदारीचा उपाय म्हणून नेव्हल डॉकयार्ड परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

मुंबईमधील नेव्हल डॉक येथे दहशतवादी हल्ला होणार असल्याबाबत मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला अचानक फोन आला अन् एकच खळबळ उडाली. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन कऱणाऱ्या व्यक्तीने स्वत:ची ओळख जहांगीर शेख अशी सांगितल्याचे समोर आले आहे. जहांगीर शेख याने तो आंध्रप्रदेशमधून बोलत असल्याचे सांगितले. या फोननंतर पोलिसांकडून त्या परिसरात सर्च ऑपरेशन राबवण्यात आले, मात्र संशयास्पद काही आढळून आले नाही. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com