Breaking News : नंदुरबारमध्ये दोन गटांत तणाव, तुफान दगडफेक; पहा Video

Nandurbar : नंदुरबार शहरात दोन गटात तणाव निर्माण झाला आसून तूफान दगडफेक सुरू आहे. दगडफेकीत 2 पोलिस कर्मचारी देखील गंभीर जखमी झाले आहेत.

नंदुरबार शहरात दोन गटात तणाव निर्माण झाला आहे. शहरातील माळीवडा परिसरात तुफान फान दगडफेक सुरू आहे. या दगडफेकीत अनेक वाहनांना यंग लावण्यात आली आहे. यात दुचाकी जाळून राख झाल्या आहेत. या दगडफेकीत 2 पोलिस कर्मचारी देखील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नंदुरबार शहरातील माळीवडा भागात दोन गटात वाद निर्माण झाला आणि त्यांतर दगडफेक सुरू झाली. या वादाचं स्वरूप वाढत गेल्याने परिसरातील वाहनांना आग लावण्यात आली. यात दुचाकी जाळून राख झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच या भागात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा देखील वापर करण्यात आला आहे. या सर्व घटनेत दोन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेचं कारण मात्र अद्यापही समजलेलं नसून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा हजार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com