Asia Cup Hockey 2025 : टीम इंडियाने चौथ्यांदा कोरलं आशिया कपवर नाव; अंतिम फेरीत दक्षिण कोरियाला धूळ चारली

Asia Cup Hockey 2025 : टीम इंडियाने चौथ्यांदा आशिया कपवर ताबा मिळवला आहे. अंतिम फेरीत टीम इंडियाने दक्षिण कोरियाला धूळ चारली आहे.
Asia Cup
Asia Cup Hockey 2025Saam tv
Published On
Summary

भारताने हॉकी आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाचा ४-१ ने पराभव

सामना बिहारच्या राजगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये पार पडला

भारताने स्पर्धेतील एकही सामना न गमावता अंतिम फेरीत प्रवेश

विजयामुळे भारत वर्ल्डकप २०२६ साठी थेट पात्र

हॉकी आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण कोरियावर मात केली आहे. बिहारच्या राजगीर स्पोर्ट्स कॉम्पलेक्समध्ये झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण कोरियावर ४-१ ने नमवलं. आशिया कप जिंकल्याने आता २०२६ साली आयोजित करण्यात आलेल्या हॉकीच्या वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने स्थान निश्चित केलं आहे.

भारताने चौथ्यांदा हॉकीच्या आशिया कपवर नाव कोरण्यात यश आलं आहे. भारताने पाचव्यांदा चॅम्पियन दक्षिण कोरियाला नमवलं आहे. याआधी भारताने २०१७ साली मलेशियाला धूळ चारून आशिया कप जिंकला होता.

Asia Cup
Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या विसर्जनाला २४ तास उशीर, जबाबदार कोण? अध्यक्षांकडून दिलगिरी

स्पर्धेच्या या अंतिम सामन्यात पहिल्या क्वार्टरमध्ये भारताच्या सुखजीत सिंहने गोल केला. पहिला क्वार्टर संपल्यानंतर भारत १-० ने पुढे होता. भारताने दोन्ही क्वार्टरमध्ये १-१ गोल केला. त्यामुळे भारताने २-० ने आघाडी मिळवली. पढे अर्धा वेळ संपल्यानंतर भारताचा स्कोर २-० झाला. पुढे सामन्यात दक्षिण कोरियाने आक्रमकरित्या खेळूनही एकही गोल करता आला नाही.

भारताच्या हॉकी टीमने शेवटच्या सुपर -४ सामन्यात चीनला ७-० ने धूळ चारून अंतिम सामन्यात स्थान मिळवलं. या स्पर्धेत भारताने एकही सामना गमावला नाही. दुसरीकडे दक्षिण कोरियाने शेवटच्या सुपर-४ सामन्यात मलेशियाला ४-३ ने पराभूत केलं. मलेशियाला धूळ चारून कोरियाने अंतिम सामन्यात स्थान निश्चित केलं.

Asia Cup
lalbaugcha raja : ...अन् अंबानींचे सुरक्षा रक्षक आणि कोळी बांधवांनी तराफा पाण्यात ढकलला; लालबागचा राजा विसर्जनासाठी सज्ज, VIDEO

भारताने आतापर्यंत २००३, २००७, २०१७ त्यानंतर आता २०२५ साली चौथ्यांदा आशिया कप जिंकला आहे. तर टीम इंडिया वर्ष १९८२, १०८५, १९८९,१९९४ आणि २०१३ अशा एकूण ५ वेळा उपविजेता ठरली आहे. टीम इंडिया आशिया कप जिंकल्याने सोशल मीडियावर चाहत्यांकडून कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com