दोन दशकांनंतर Tata Sierra ची दमदार एन्ट्री; हटके फीचर्सची भर, आता किंमती किती? VIDEO

Tata Sierra Booking Date And Delivery Timeline: दोन दशकांनंतर टाटा सिएरा दमदार वैशिष्ट्यांसह पुन्हा बाजारात आली आहे. ११ लाखांच्या किमतीत ट्रिपल स्क्रीन डॅशबोर्ड, पेट्रोल-डिझेल-ईव्ही पर्याय आणि फाइव्ह-जी कनेक्टिव्हिटीसह ही मिड-साइज एसयूव्ही ग्राहकांसाठी एक आकर्षक पर्याय ठरणार आहे.

टाटा मोटर्सने आपली आयकॉनिक सिएरा एसयूव्ही तब्बल दोन दशकांनंतर बाजारात पुन्हा आणली आहे. या मिड-साइज एसयूव्हीची सुरुवातीची किंमत ११ लाख रुपये आहे. ज्यामुळे ती थेट ह्युंदाई क्रेटा आणि किया सेल्टॉस सारख्या गाड्यांना स्पर्धा देईल. नवीन टाटा सिएरा ही भारतातील पहिली एसयूव्ही आहे. जिच्या डॅशबोर्डवर तीन मोठ्या स्क्रीन्स आहेत. ही गाडी पेट्रोल, डिझेल आणि ईव्ही अशा तीन पॉवरट्रेन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यात दीड लिटर टर्बो पेट्रोल आणि डिझेल इंजिन असून, दोन्ही मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येतात. गाडीमध्ये फाइव्ह-जी कनेक्टिव्हिटी, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले यांसारखी प्रीमियम वैशिष्ट्ये देखील आहेत. या गाडीसाठी बुकिंग १५ डिसेंबरपासून सुरू होणार असून, ग्राहकांना जानेवारी २०२६ पासून डिलिव्हरी मिळण्यास सुरुवात होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com