Breaking News

Tara Bhawalkar on Language Row : विद्यार्थ्यांना पहिलीपासून इंग्रजी भाषाही नको; तारा भवाळकर असे का म्हणाल्या? VIDEO

Tara Bhawalkar News : पहिलीपासून इंग्रजीही नको, असं ज्येष्ठ साहित्यिक तारा भवाळकर यांनी मत मांडलं आहे. पहिलीपासून चौथीपर्यंत मातृभाषा शिकवायला हवी, असं भवाळकर यांनी म्हटलं आहे.
video

त्रिभाषा सूत्रावरून राजकीयसहित साहित्यिक विश्वातही चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणावर 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी मत व्यक्त केलं आहे. पहिलीपासून इंग्रजीही नको, असं डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केलं आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना पहिलीपासून चौथीपर्यंत फक्त मातृभाषा शिकवायला हवी. त्यांना त्या वयात इतर भाषांचा फारसा संपर्क येऊ न दिल्यास त्यांची मातृभाषा पक्की होण्यास मदत होते. मात्र या विद्यार्थ्यांवर पहिलीपासून 3 भाषा लादण्याचा निर्णय घेतला जात आहे. असा निर्णय पूर्णपणे अशैक्षणिक, अन्यायकारक असल्याचं ज्येष्ठ साहित्यिका तारा भवाळकर यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com